भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांचा ठाकरे सरकारला टोला

भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांचा ठाकरे सरकारला टोला

नाशिक : महाराष्ट्रात सध्या कोविडमुळे हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे सरकारने सध्या संपूर्ण संचारबंदी तर लागू केलीच आहे, परंतु त्याशिवाय सर्व दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचे आदेश देखील दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नाशिकमध्ये भलतीच मनावर घेतली गेलेली पहायला मिळाली. जुन्या नाशिक शहरात मर्तिकाचे सामान विकाणारी दुकानेही ११ वाजता बंद केली जात आहेत.

नाशिक शहरात कोरोनाचा कहर खूपच वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्ये देखील सकाळी ११ वाजता सर्व दुकाने बंद केली जात आहेत. प्रशासनाने नियम पाळण्याचा आपला अधिक उत्साह दाखवत मर्तिकाचे सामान विकणारी दुकाने देखील ११ वाजता बंद करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मरायचं तर ते ही ११ च्या आतच का असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,
बिनडोकपणाचा कहर… लॉक डाउनच्या नियमांची अंमलबजावणी करताना जुन्या नाशिक शहरात मर्तिकाचे सामान विकणारी दुकानेही सकाळी ११ वाजता बंद करण्यात येत आहेत. आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी जेणे करून अंतिम प्रवासात अडथळे येणार नाहीत.
rashtravadi shivsena 1 750x430 1

त्यामुळे आता सरकारच्या नियमांच्या वेळातच लोकांनी प्राण सोडायचे का असा संतप्त सवाल केला जात आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत