बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप

बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप

Pressure on local commuters by making bogus iCards

मुंबई : बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सध्या मध्य रेल्वेतून 18 लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास घेणे बंधनकारक राहणार आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत