बेलापूरमधील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

बेलापूरमधील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

Eviction proceedings against unauthorised constructions in Belapur

नवी मुंबई- सीबीडी- बेलापूर विभागातील सेक्टर ३६ आणि करावेगांव येथे महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरू होते. या अनधिकृत बांधकामास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीसनुसार हे अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले असल्याचे नवी मुंबई महानगपालिकेने सांगितले.

WhatsApp Image 2021 06 18 at 5.28.38 PM1

या अनधिकृत बांधकामांवर बेलापूर विभागामार्फत धडक मोहीमेचे आजोयन करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहीमेसाठी बेलापूर विभागातील अधिकारी / कर्मचारी, २० मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर, १ जेसीबी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. त्याचप्रमाणे भविष्यात देखील अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील नवी मुंबई महानगरपालिकेने यावेळी दिला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत