बीड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका अर्जावर पीक कर्ज उपलब्ध करून द्या- प्रकाश सोळंके

बीड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका अर्जावर पीक कर्ज उपलब्ध करून द्या- प्रकाश सोळंके

बीड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका अर्जावर पीक कर्ज उपलब्ध करून द्या- प्रकाश सोळंके

प्रतिनिधी परतूर मंठा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेना जिल्हा जालन्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन देऊ मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, “परतूर मंठा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी थकीत कर्ज शेतकरी लाभार्थ्यांचे साक्षीदारांच्या व्यवहारावर निर्बंध घातल्यामुळे संबंधित शेतकरी लाभार्थ्यांना त्यांचा व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारवाई करावी कारण २२ मार्च २०२० पासून कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे लॉकडॉन आहे अनेक संकटांना तोंड देत बरेच व्यवहार बंद आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वसुली थकित बँकेचा कर्जदार त्या कर्जदाराचे साक्षीदार यांचे व्यवहार पूर्णपणे बंद केल्यामुळे लाभार्थी शेतकरी अडचणी आले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मोंठा परतुर, या बँकेने थकीत कर्जदार शेतकरी मुरलीधर देवराव खवल, यांच्या कर्ज प्रकरणासाठी साक्षीदार म्हणून बळीराम मुक्तीराम भाकड, राम आसाराम खवल, यांनी साक्षीदार म्हणून कर्ज प्रकरण फाईल वरची सह्या केल्या होत्या, त्याचा गंभीर परिणाम ते आज भोगत आहे, साक्षीदार शेतकरी बळीराम मुक्तीराम भाकड राहणार पाटोदा माव यांचे महाराष्ट्र बँकेच्या अकाउंट मध्ये एक लाखापेक्षाही अधिक रक्कम बँकेत जमा आहे परंतु संबंधित बँकेच्या व्यवस्थापनाने यांचा व्यवहार निर्बंध घालून बंद केला आहे.

असा प्रकार राष्ट्रीयीकृत बँका परतूर मंठा तालुक्यामध्ये जाचक नियम अटी घालत शेतकऱ्यांना भेटीस धरून मानसिक आर्थिक त्रास देत आहे, खरेतर बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत, फील्ड ऑफिसरने प्रत्येक दत्त गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना एक अर्ज घेऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत, अशाप्रकारे मंठा परतूर तालुक्यात सुद्धा राष्ट्रीयीकृत बँकांना आदेश देऊन एका अर्जावर ती शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे, कोरोना जग हैराण आहे, यामुळे आपत्कालीन व्यवस्था निर्माण झाल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकार मनुष्य जगला पाहिजे यासाठी अनेक उपाययोजना करून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे.

WhatsApp Image 2021 06 29 at 3.35.57 PM 1

परतूर मंठा तालुक्यातील राष्ट्रीय कृत बँक त्याच मनुष्याला मानसिक आर्थिक त्रास देत असल्यामुळे संबंधित बँकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी अपेक्षा आहे,परतूर मंठा तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी जाचक अटी नियम घालून शेतकरयांना अडचणी निर्माण करून संबंधित थकीत कर्जदार शेतकरी त्या शेतकऱ्यांचे साक्षीदार यांचे कोणतेही व्यवहार बँकेने बंद करू नये येत अशाप्रकारे त्वरित कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्यावतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी,प्रकाश सोळंके,मनसे जिल्हाध्यक्ष जालना,कृष्ण गोवर्धन सोळंके
मनसे तालुकाध्यक्ष परतुर,गणेश ज्ञानेश्वर बोराडे मनसे तालुकाध्यक्ष मंठा,भारत शेळके उपतालुका अध्यक्ष परतुर, केशव शिंदे तालुका संघटक मंठा, प्रशांत काकडे शहराध्यक्ष मंठा, आत्माराम जगताप,मनशेसे उपतालुका.अध्यक्ष सुरेश सुरुंग, बळीराम भाकड, महारुद्र टेकाळे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत