बालकामगार नकोच!!

बालकामगार नकोच!!

बालकामगार आपल्या भारताला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बर्याच ठिकाणी लहान मुलं आपल्याला काम करताना दिसतात. मग ते हॉटेल असो वा चहाची टपरी असो किंवा मग लहान लहान कंपन्या असो तसेच घर काम करण्यामध्ये ही मुलांचा समावेश असतो. याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थिती आहे, आई-वडीलांचे कमी उत्पन्न, मोठे कुटुंब तसेच बरीच कारणं ही आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना काम करण्यास भाग पाडले जाते.

शहरी तसेच ग्रामीण भागात सुध्दा लहान मुलं काम करताना दिसतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे व खेळण्यांचे दिवस असतात त्या वयात मुल काम करताना दिसतात. अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहेत पण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणं गरजेचं आहे.

बालकामगार ही समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास मुलांना शाळेत पाठवणे तसेच आरोग्य व गरजेच्या वस्तू मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आपण हि सुजाण नागरिक म्हणून १८ वर्षांखालील मुलांना काम न करु देणे. तसेच कुठे लहान मुलं काम करताना आढळल्यास चौकशी करणे. त्यांना शक्य होईल ती मदत करणे जेणेकरून ते त्यांचं बालपण जगू शकतील.

बालमजुरी ही भारतात असू नये. त्यांना मोफत शिक्षण घेण्याचा हक्क आहे व त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

देवांश आगिवले, ९वी
साधना विद्यालय सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत