बायकोला नवऱ्याच्या गोष्टी माहिती नसाव्या का?- मॉडेल सागरिका शोना सुमन

बायकोला नवऱ्याच्या गोष्टी माहिती नसाव्या  का?- मॉडेल सागरिका शोना सुमन

Should wife not know her husband's story? - Model Sagarika Shona Suman

अश्लिल व्हिडीओ बनवणे आणि ते साईटवर अपलोड केल्याप्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेहशी दिले आहेत. राजच्या अटकेनंतर याप्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीची काय भूमिका होती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आतपर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शिल्पाचे नाव अद्याप आलेले नाही. परंतु मॉडेल सागरिका शोना सुमन हिने मात्र, या सर्व गोष्टींची शिल्पाला पूर्ण कल्पना होती, असा खळबळजनक आरोप केला आहे.

WhatsApp Image 2021 07 22 at 12.06.20 PM

बायकोला नवऱ्याच्या गोष्टी माहिती असतात

पॉर्नोग्राफी प्रकरणाविरोधात पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणामध्ये राज कुंद्रा चा सहभाग असल्याचा संशय सर्वप्रथम मॉडेल सागरिका शोनाने केला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये राजच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले आणि त्याला अटक करण्यात आली. राजला अटक झाल्यानंतर सागरिका शोनाने एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘या प्रकरणाची संपूर्ण माहिती राजची बायको शिल्पा शेट्टी ला होती. कारण राजच्या प्रत्येक कंपनीमध्ये ती डायरेक्टर आहे. कंपनीमध्ये काय चालले आहे हे त्या कंपनीच्या डायरेक्टरला माहिती नाही असे कसे होऊ शकते? त्यामुळे पोलिसांनी शिल्पाची देखील सखोल चौकशी करायला हवी. तिला या पॉर्न रॅकेटबद्दल सर्व माहिती असणारच आहे, याची मला खात्री आहे.’पोलिसांना नक्कीच मदत करीन

RAJ KUNDRA MODAL e1626772890181

सागरिकाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ याप्रकरणी जर मला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की जाईन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करीन. मला ऑडिशनवेळी जो कॉल आला होता तो व्हॉट्सअप कॉल होता. त्यामुळे मला तो रेकॉर्ड करता आला नाही. अन्यथा तो पुरावा म्हणून मी पोलिसांना देऊ शकले असते.’व्हॉट्सअपवर न्यूड व्हिडीओ पाठवण्याची मागणी

सागरिकाने याआधी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, एका वेब सीरिजसाठी तिने व्हिडीओ कॉलद्वारे ऑडिशन दिली होती. ही ऑडिशन राज कुंद्रा, त्याचा साथीदार उमेश कामथ आणि आणखी एका व्यक्तीने घेतली होती. या व्यक्तीने मास्क लावला होता. ही ऑडिशन सुरू असताना राज कुंद्राने तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले. परंतु तिने ही गोष्ट करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत