बंडातात्या कराडकर हे पोलिसांच्या ताब्यात

बंडातात्या कराडकर हे पोलिसांच्या ताब्यात

Bandatatya Karadkar is in police custody

पुणे : सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. अशातच आज पहाटे हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल (शुक्रवारी) बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत