“फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिलांची नोटीस”

“फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिलांची नोटीस”

Advocates notice to students who do not pay fees

नवी मुंबई : कोरोना काळात सर्वसामान्या नागरिकांची आर्थिक स्थिती आधीच गडबडली आहे. अशात शाळांना पालकांकडून जबरदस्ती फी वसूल करू नका असे सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र असं असलं तरी शाळा सरकारचा आदेश धाब्यावर बसवत आहेत. नवी मुंबईतील काही शाळांनी तर चक्क फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिलांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.कोरोना मुळे पालकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले, उद्योगधंदे बंद पडले. आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरू असताना हजारो रूपयांची फी भरायची कुठून असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही एक्स्ट्रा ॲक्टिव्हीटी सोडून शाळेची ट्युशन फी फरायला पालक तयार आहेत. मात्र यानंतरही शाळा व्यवस्थापन पूर्ण फी वर अडून बसले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत