फक्त उष्णताच नाही तर लिप्स कॅन्सरचं लक्षणं असू शकतात कोरडे ओठ; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

फक्त उष्णताच नाही तर लिप्स कॅन्सरचं लक्षणं असू शकतात कोरडे ओठ; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

धुम्रपान केल्यामुळे लिप्स कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो, हुक्का पाईप किंवा धुम्रपान केल्यानं या प्रकारच्या आजाराचा धोका वाढू शकतो.

शरीरातील पेशींची असामान्य वाढ  झाल्यास कॅन्सरचा आजार होतो.  इतर अवयवांप्रमाणेच ओठांवरही पेशींची असामान्य वाढ झाल्यास कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो. जास्तीत जास्त कॅन्सरच्या केसेसमध्ये शेवटच्या स्टेजला या आजाराची माहिती मिळते. कारण जास्तीत जास्त लोक शरीरावरच्या हलक्या, साध्या वाटत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. लिप कॅन्सर हा एक जीवघेणा (Symptoms of Lip cancer) आजार आहे. यामुळे व्यक्तीचे खाणं पिणं कठीण होऊ शकतं. याशिवाय व्यक्तीच्या सौंदर्यावरही (Treatment of Lips Cancer)  परिणाम होऊ शकतो. 

लिप कॅन्सरबाबत गाजियाबादचे ओरल हेल्थ एक्सपर्ट डॉक्टर स्मिता यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना सांगितले की, लिप कॅन्सर सुर्याच्या किरणांमध्ये जास्तीत जास्तवेळ राहिल्यानं उद्भवतो. या व्यतिरिक्त तंबाखू, गुटखा, असा पदार्थांचे सेवन केल्यास हा आजार बळावण्याचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला लिप कॅन्सरचे उपाय, लक्षणं आणि कारणांबाबत सांगणार आहोत. 

कसा ओळखायचा ओठांचा कॅन्सर

ओठ कोरडे पडणं

ओठांतून रक्त बाहेर येणं

दात हलू लागणं

ओठांमध्ये सूज आणि वेदना

घसा आणि तोंडाजवळ वेदना जाणवणं

आवाजात बदल

खाण्यापिण्यास त्रास उद्भवणं

ओठांवर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे डाग

अन्न गिळायला त्रास होणं.

लिप्स कॅन्सरची कारणं

तंबाखू , गुटखा सर्वाधिक सेवन लिप कॅन्सरचं कारण ठरू शकतं. याशिवाय सुर्याच्या किरणांमध्ये जास्तवेळ बसणं, ओरल सेक्स करत असलेल्यांना लिप्स कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो, धुम्रपान केल्यामुळे लिप्स कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो, हुक्का पाईप किंवा धुम्रपान केल्यानं या प्रकारच्या आजाराचा धोका वाढू शकतो. 

lips care inner 2 202105615061

सर्वाधिक धोका कोणाला? 

महिलांच्या तुलनेत पुरूषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता  जास्त असते. 

४० पेक्षा अधिक वयाच्या जास्त लोकांना लिप कॅन्सर होऊ शकतो.  

दारूचे जास्त सेवन या आजाराचं कारण ठरू शकतं. 

ह्यूमन पेपिलोमा व्हायरसनं संक्रमित लोकांना हा आजार उद्भवू शकतो. 

निदान

प्रथम आपल्या ओठांवरील जखम तपासून लिप कॅन्सर स्क्रीनिंग केली जाते. यासाठी डॉक्टर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारू शकतात. हे जखम किती काळापासून आहे, आपल्याला कोणत्या प्रकारची समस्या आहे, आपण धूम्रपान करता किंवा नाही? असे बरेच प्रश्न डॉक्टर विचारू शकतात, त्या आधारे कॅन्सरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्यतिरिक्त, जर डॉक्टरला कॅन्सरबाबत शंका आली असेल तर  पुढील चाचण्या करण्यास सांगितलं जाऊ शकतं. 

कंप्यूटेड स्कॅन केलं जाऊ शकतं.

MRI म्हणजेच मॅग्नेटिक इमेज रेजोनेंस 

पोसिट्रॉन ( Positron ) एमिशन टेस्ट 

चेस्ट एक्स रे (Chest X-ray) 

एंडोस्कोपी (Endoscopy) 

उपचार

या कॅन्सरचे उपचार रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, केमोथेरपी सारख्या तंत्राने केला जातो. या व्यतिरिक्त कॅन्सरचा इतरही अनेक प्रकारे उपचार केला जातो. उदाहरणार्थ, – टार्गेटेड थेरेपी (Targeted Therapy),  इम्म्यूनोथेरेपी (Immunotherapy), जीन थेरेपी(Gene Therapy) इनवेस्टिगेटिव ट्रीटमेंट (Investigative Treatment) या तंत्रांचा वापर करून कॅन्सरचे योग्य टप्पे ठरवल्यानंतर उपचार केले जातात.

ओठांची पुनर्रचना केली जाते, जेणेकरून आपले ओठ पूर्वीसारखेच बनतील. ट्यूमर खूप जास्त मोठा असेल  तर किमोथेरेपीच्या मदतीनं ट्यूमर छोटा केला जातो.  त्यानंतर सर्जरीनं बाहेर काढला जातो. जेणेकरून दुसरा ट्यूमर वाढणार नाही. याशिवाय औषधांच्या वापरानंही तुम्ही या आजारावर उपचार करू शकता. 

बचावाचे उपाय

तंबाखू आणि गुटख्यापासून लांब  राहा

धुम्रपान करू नका

फळ आणि भाज्यांचे सर्वाधिक सेवन करा

नियमित स्वरूपात व्यायाम करा

निरोगी जीवनशैली ठेवा

जास्तवेळ उन्हात जाऊ नका

तोंडाच्या समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

दातांचे नियमित चेकअप करा.

कॅन्सर झाल्यास डाएट कसं असावं

ठराविक वेळेनंतर थोडं थोडं खात राहा

जास्त मसालेदार, तेलयुक्त पदार्थांचे सेवन करू नका.

शिळं उघड्यावरचं अन्न खाऊ नका.

जास्तीत जास्त पाणी प्या.

फायबर्सयुक्त आहार घ्या. कॅन्सरच्या रुग्णांसाठी हे खूप लाभदायक मानलं जात आहे. 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत