पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना २३ तारखे पर्यंत पोलीस कोठडी

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना २३ तारखे पर्यंत पोलीस कोठडी

Raj Kundra remanded in police custody till 23rd in pornography case

मनोरंजन विश्वातील बॉलिवूड इंडस्ट्री ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. अशात चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराने काही चुकीचे कृत्य केले तरी तो बरोबरच आहे असे वाटते आणि असे समजणारे देखील अनेक चाहते असतात. अशात आता पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा याचा हात असून त्याला पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. त्याच्या या कृत्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्री पुन्हा एकदा शरमेने झुकली आहे.

RajKundra


याची सुरवात नेमकी कुठून झाली
मुंबई मधील मडायलँड परिसरामध्ये पोलिसांनी पॉर्न चित्रफिती बनवणाऱ्या रॅकेटवर छापा मारला होता. यामध्ये ऍक्टरेस्ट गहाण वशिश्ठ हिला अटक करण्यात आली. यानंतर सुरु झालेल्या चौकशीमध्ये प्रथमतः राज कुंद्रा याचे नाव पुढे आले. यूके मध्ये एका प्रोडक्शन हाऊस च्या माध्यमातून अँप द्वारे पोर्नफिल्म्स प्रकाशित केल्या जात होत्या व त्या ॲप वरून सबस्क्राईब करणाऱ्या व्यक्तींकडून पैसे आकारले जाऊन त्या व्हिडिओ विकल्या जात होत्या आणि यामध्ये पैशांची मोठी आर्थिक उलाढाल सुरु होती. या प्रोडक्शन हाऊसमध्ये भागीदारीने मालक राज कुंद्रा आहे अशी माहिती पोलिसांकडे असल्याने ठोस पुरावे सादर कारत राज कुंद्रा याला अखेर अटक करण्यात आली असून २३ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Raj Kundra mumbai court 1626780237981 1626780248477


त्याच्या अटकेनंतर आता शिल्पा शेट्टी ही पूर्ती अस्वस्थ झाली असून तिने आपले पुढील सर्व शूट हे रद्द केले व राज ला सोडवण्यासाठीचे सर्वोतोपरी प्रयत्न तिने आता सुरु केले आहेत. दरम्यान तिने या संदर्भात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास देखील सुरुवात केली आहे.त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडेच राज कुंद्रा सह शिल्पा शेट्टी च्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत