पोटावरील फॅटबर्न कमी करण्यासाठी, घरबसल्या ट्राय करा Whole30 डाएट प्लान,‘ही’ आहे डाएटची पद्धत!

पोटावरील फॅटबर्न कमी करण्यासाठी, घरबसल्या ट्राय करा Whole30 डाएट प्लान,‘ही’ आहे डाएटची पद्धत!

फिटनेस टिकवण्यासाठी नियमित वर्कआउट करणे जितकं गरजेचं असतं तितकंच डाएट फॉलो करणं व त्यावर बारकाईने लक्ष देणं देखील तितकच आवश्यक असतं. कोरोनामुळे सध्याच्या काळात बरेच लोक आरोग्याबद्दल जागरूक होताना दिसून येत आहेत. कोविडमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये जेथे बरेच लोक वजन वाढून लठ्ठ झाले आहेत तिथे अनेक लोकांनी स्वतःला फिटनेस फ्रीक देखील बनवले आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामासह योग्य आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. अन्यथा असे बरेच लोक आहेत जे जिममध्ये तासन् तास घाम गाळतात पण त्यांच्या शरीरावरील चरबी काही कमी होत नाही.

दुसरीकडे जर आपण डेली रूटीनमध्ये आहाराचे योग्य पालन केले तर आपण जिममध्ये घाम न गाळता देखील स्वत:ला फिट ठेवू शकतो. वास्तविकता आमच्या आणि तुमच्यापैकी बरेचजण असे असतील जे दिवसभर ऑफिसचं काम केल्यावर वर्कआउटसाठी वेळ काढू शकत नाही आणि म्हणूनच ते दिवसेंदिवस लठ्ठ होत जातात. पण जर आपण नियमित हेल्दी डाएटचे पालन केले तर आपण स्वत:ला बर्‍याच प्रमाणात बदलू शकतो. आज आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी Whole30 डाएट प्लानद्दल जाणून घेणार आहोत जे फॉलो करून आपण नेहमी स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकतो.

या आहार योजनेची स्थापना अमेरिकेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेलिसा हार्टविग अर्बन यांनी केली आहे. जर आपल्याला Whole 30 डाएट प्लानचा वापर करून फिट रहायचे असेल तर हे डाएट तुम्हाला फक्त ५ किंवा १० दिवस नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी फॉलो करावे लागेल. याबद्दल मेलिसा म्हणते की ती Whole 30 ला डाएट म्हणायला नको, कारण कॅलरी कमी करण्यासाठी यामध्ये आपल्याला भुकेले देखील राहावे लागते. पण हे निरोगी जीवनासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी खूप प्रभावी आहे. जेव्हा आपण हे डाएट फॉलो करत असाल तेव्हा आपल्याला आहारातील अशा सर्व खाद्यपदार्थांवर बंदी घालावी लागेल ज्यामुळे सूज किंवा इन्फ्लेमेशन होते.

‌या डाएट प्लानमध्ये साखर व साखरेच्या सर्वच पदार्थांचे सेवन करण्यावर बंदी असते.

‌सिगारेट, दारू किंवा कोणत्याही प्रकारची नशा करण्यास बंदी असते.

‌रिफाइंड ऑइलपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू शकत नाही.

‌संपूर्ण तृणधान्य आणि डाळींपासूनही अंतर राखावे लागेल.

‌रिफाइंड, जंक फूड, स्ट्रीट फूड आणि प्रोसेस्ड फूड टाळावे लागतील.

जोपर्यंत आपण हा डाएट प्लान पूर्णपणे फॉलो करत नाही तोपर्यंत आपणास आपले वजन मोजण्यास देखील मनाई असते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत