पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला अटक

पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला अटक

पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी (Sagar Rana Murder Case) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचा साथीदार अजयला अटक करण्यात आली आहे.

पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंजाब येथून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी या दोघांना दिल्लीत घेऊन जाण्याची तयारी सुरु केली आहे. या हत्येनंतर सुशील कुमार फरार झाला होता. दरम्यान, फरार असलेल्या सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये तर, अजयची माहिती देणाऱ्यास 50 हजार बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

सुशील कुमार आणि त्याच्या साथीदाराने 4 मे रोजी सागर राणा याच्यासहीत चार जणांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. हल्लेखोरांपैकी एक प्रिन्स दलालने या घटनेचे व्हिडिओ बनविले होते. घटनास्थळी पोलिस आल्यावर सर्वजण तेथून पळून गेले. परंतु, प्रिन्स पकडला गेला. पोलिसांना झडती घेत असताना एक मोबाईल फोन सापडला. या फोनमध्ये काही व्हिडिओ आढळले. या व्हिडीओमध्ये सुशीलकुमार आपल्या साथीदारांसहसागर राणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. तसेच छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर राणा आणि अन्य दोघांना मारहाण करताना दिसत आहे. 

दरम्यान, पोलिसांपासून बचाव करण्यासाठी सुशील सतत ठिकाणे बदलत होता. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पुलीस गुन्हेगारी शाखा पथक त्याचा शोध घेत होती. दिल्लीसह अनेक राज्यात त्याचा शोध घेतला जात असताना सुशील मेरठच्या टोल प्लाझावर दिसला. तो उत्तराखंडच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी टोल प्लाझाजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. तसेच त्याचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो हरिद्वारमध्ये लपल्याच्या बातम्याही माध्यमात आल्या होत्या. आज अखेर पोलिसांनी त्याला पंजाबमधून अटक केली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत