पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई विरोधात नागरिकांचा संताप |TMN :- तेजस्वी त्रिभुवन

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई विरोधात नागरिकांचा संताप |TMN  :- तेजस्वी त्रिभुवन

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई विरोधात नागरिकांचा संताप |TMN

घरगुती गॅसच्या भावात  तब्बल ५० रुपयांची वाढ

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. पेट्रोलनं तर अनेक ठिकाणी शंभरी पार केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे. महिन्याभराच्या कालावधीत सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे.  विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत आज सरकारने मोठी दरवाढ केली असुंन महागाईने त्रस्त जनतेला आणखी मोठा दणका  दिला आहे.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर  सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे.

केंद्र सरकार सबसिडी सतत कमी करीत असून, त्यामुळेच गॅस सिलिंडर महाग होत आहेत. लोकांना ते घेणे परवडेनासे झाले आहेत आणि त्यांची मागणी ही घटली आहे. अनेक जणांनी गॅस सिलिंडर घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागांतील गरीब तर पुन्हा चुलीचा वापर करू लागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर पोहोचली आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी ५० रुपयांची वाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत