पेट्रोलियम पदार्थाच्या करामधून सरकारची बंपर कमाई

पेट्रोलियम पदार्थाच्या करामधून सरकारची बंपर कमाई

Government's bumper revenue from petroleum tax

नवी दिल्ली : देशातील पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंधनांच्या या वाढत्या किंमतीमुळे देशातील सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमतीवरील कर कमी करावा आणि त्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वत्र होताना दिसतेय. मात्र केंद्र सरकारचे यामागचे गणित वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील कस्टम आणि एक्साईज करातून केंद्र सरकारचा महसूल 56 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालंय. आकड्यात सांगायचं झाल्यास ही रक्कम साडे चार लाख कोटींहून जास्त आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे.

सीमा शुल्कातून 46 हजार कोटी रुपयांची कमाई
केंद्र सरकारने 2020-21 या सालासाठी, पेट्रोलियम पदार्थांवर लावण्यात आलेल्या कस्टम ड्यूटीच्या माध्यमातून 37 हजार 806 कोटी रुपयांची कमाई केली आहे तर एक्साईज करातून 4.13 लाख कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या आयात कराच्या माध्यमातून केंद्र सरकारने 46 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत