पुण्यातील नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला दिला उस्फुर्त प्रतिसाद!!

पुण्यातील नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला दिला उस्फुर्त प्रतिसाद!!

संपूर्ण राज्यभरात शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसांसाठी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांनी या विकेंड लॉकडाऊनला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. शहर आणि उनगरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आदेशानुसार सुरवातीला सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. ह्या पाच दिवसामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा परिस्थतीमध्ये सुद्धा पुणेकर बाहेर पडत होते. पण आज विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहेत. रुग्णालयात नागरिकांना उपचारासाठी बेडही उपलब्ध नाहीयेत. पुण्यातील सद्यस्थितीत ५ हजारांहून अधिक जास्त रुग्ण आढळत आहेत.

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी आता हातावर मोजण्या इतके तुळरक वाहने दिसत आहेत.

:- शुभम भोसले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत