पुण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, आयुक्त विभागांनी केली अशाप्रकारे मदत

पुण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, आयुक्त विभागांनी केली अशाप्रकारे मदत

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिथे भयानक चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती या रुग्णालयात २४ तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा आहे. तर, शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्येही परिस्थिती फार चिंताजनक आहे. मध्यरात्री अचानक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पोलिसांनी धावाधाव करत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला. दरम्यान, महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील हे स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात बसून होते. त्यांनी बैठक घेऊन त्यासंबंधित परिस्थितीवर तोडगा काढाण्यासाठी प्रयत्नही सुरु केले.

महानगर पालिकेच्या पथकाकडून खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे ढाकणे यांनी सांगितले आहे. ढाकणे आणि त्यांची टीम सकाळपर्यंत ऑक्सिजन वितरण करण्याचे काम करत होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील या कामात चांगली मदत केली असे त्यांनी सांगितले. चाकण आणि इतर जिल्ह्याला जाणारा साठा इकडे वळवण्यात आल्याने मोठा धोका टळला आहे. बरीच कसरत करत रात्रभर ऑक्सिजन पुरठवा केला.

खासगी रुग्णालयांमध्ये छोटे गॅस पुरवठाधारक आहेत. त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. रात्रीची परिस्थिती भितीदायक होती. दोन-तीन तासात ऑक्सिजन संपेल एवढाच साठा खासगी रुग्णालयाकडे शिल्लक होता. मात्र, महानगर पालिकेच्या प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत ऑक्सिजन पुरवला केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत