पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घडली एक खळबजनक घटना;

पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घडली एक खळबजनक घटना;

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरापसून एक लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही खूप ताण बसत आहे. त्यामुळे ठिकठिकााहून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.

बिहारमध्यल्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्या व्यक्तीचं मृत्युपत्र तयार करण्याचा प्रकार समोर आला आहे. पीएमसीएच मधील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील मोहम्मदपुरचा तो रहिवासी असलेला चुन्नू कुमारला ब्रेन हॅम्रेज झालं होत. त्यामुळे त्याला पीएमसीएच ह्या रुग्णलयांमध्ये दाखल करण्यात आले होते. ह्याच उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती चाचणी पॉसिटिव आली. त्यामुळे त्याला कोरोनाच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

3corona 20patient 5

उपचारादरम्यान चुन्नू कुमारचा मृत्यु झाला ही बातमी रुग्णालय प्रशासनांकडून रविवारी त्यांच्या पत्नीला आणि भावाला देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाने घाईगडबडीत चुन्नू कुमारचा मृतदेह त्याच्या भावाच्या हाती म्हणजेच मनोज कुमारकडे सोपवला आणि त्याचसोबत मृत्युपत्र देखील त्याच्या हाती दिले. प्रशासकीय अधिकाराच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार सुरू असताना चुन्नूच्या पत्नीने पतीचा चेहरा पाहण्याची ईच्छा तिथे व्यक्त केली. पत्नीने हट्ट केल्याने मृतदेहावरील कपडा काढण्यात आला. त्यावेळी तो मृतदेह दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीचा असल्याच पत्नी आणि कुटुंबीयांच्या लक्षात आले आणि त्याचा धक्का सगळ्यांना बसला.

यानंतर पीएमसीएच ह्या ऋग्ण्यालात खळबळ उडाली. सध्या पीएमसीएच प्रशासन आणि चुन्नू कुमारच्या परिवाराने देखील याला दुजोरा दिला आहे. व्यक्ती जिवंत असताना त्यांच्या नावाचे मृत्युचे प्रमाणपत्र तयार करणं ही गंभीर स्वरूपाची चूक असल्याचे पीएमसीएच अधिष्ठाता डॉ. आय. एस. ठाकूर यांनी म्हंटले आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत