पाऊलखुणा

पाऊलखुणा

चालले होते एकाकी , रस्त्यावरती अनोळखी ;
वाट होती धूसर अन् दिवस सुद्धा काळोखी !
विचारात भितीची गर्दी होती , मनात स्वप्न शांत झोपलेले ;
त्या स्वप्नाच्या स्वप्नातही असे स्वप्न जागले,
म्हणून मी अशांत पुढे चालले.
पावसाचे वादळ झाले , डोळ्यांसमोर धुके दाटले ;
त्या धुक्या – आडून स्वप्नांचे डोंगर हसले ,
मात्र सारे विरण्यापूर्वी मनात चित्र साठले .
चालू लागले पायवाट , नदीचा आला काठ ;
नदीचे पाणी ओळखीचे , माझ्या डोळ्यांतून ओघळलेल्या गालावरचे !
सावरावेसे वाटले फार , मग नदीही झाली नकळत पार ;
आता अश्रू होते पण दुःख नाही , कारण स्वप्नांचा डोंगर
नजरेसमोरून कधी हटलाच नाही !
डोंगराच्या दिशेने धावताना ” पाऊलखुणा ” उमटल्याच नाही ;
कदाचित परतीचा मार्ग या पावलांना आता मात्र ठाऊकच नाही !

                       आयुषी अनंत मोरे
                       जोशी बेडेकर महाविद्यालय
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत