पर्यावरण संवर्धनाचा जागर

दिनांक ०७/०६/२०२१,पुणे – ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दीन.प्रत्येकजण आप आपल्या परीने पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्न करत असते. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे.हेच लक्षात घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे समाजकार्य विभागातर्फे असाच एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने व्यवसायिक समाजकार्य प्रथम वर्षाच्या रेग्युलर, वर्किंग बॅच विद्यार्थी व विभागाचे प्राध्यापक/प्राध्यापिका यांनी घराच्या अंगणात,खिडकी, गॅलरी मध्ये एक झाड लावून त्याचं संवर्धन करणे असा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद देत वृक्षरोपण केले.

WhatsApp Image 2021 06 07 at 1.20.23 PM 1


त्याच प्रमाणे दिनांक ७ जून रोजी पर्यावरण दीन विशेष ऑनलाईन सत्र ठेवण्यात आले होते.ह्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून कु. प्रणाली चिकटे उपस्थित होती. प्रणाली चिकटे ही एक पर्यावरण संवर्धन यात्री असून संपुर्ण महाराष्ट्रभर तिचा सायकल प्रवास सुरू आहे. पर्यावरणासाठी ती सध्या काम करत आहे. तिच्याच प्रवासाबद्दल,अनुभव व पर्यावरण जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले. पर्यावरण व महिला सशक्तीकरण या दोन मुद्द्याने धरून तिचं सत्र प्रेरणादायी ठरल.

D2


त्याच प्रमाणे या सत्रा मध्ये विद्यार्थीनी निर्मिती शाहू हिने पर्यावरणावर पोस्टर तयार केले होते त्याचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थीनी प्रणाली पोळ हिने पर्यावरणावर कविता सादर केली. पर्यावरण जपण्यासाठी वृक्षारोपण संकल्पनेतून घेण्यात आलेल्या उपक्रमाचे संपुर्ण व्हिडिओ या सत्रात दाखवण्यात आले.

D4

या कार्यक्रमाला समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. प्रकाश यादव,सह प्राध्यापक व प्राध्यापिका केतकी सुबकडे, गीता जोशी, विजयमाला गुजर,तुषार धोडमिसे, अनंतकुमार पोळ व संपुर्ण कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका स्मिता वारघडे उपस्थित होते. व्यवसायिक समाजकार्य प्रथम वर्षाच्या रेग्युेलर व वर्किंग बॅच चे विद्यार्थीही उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थीनी भाग्यश्री जाधव , स्वागत व परिचय विद्यार्थि विरेश बारोळे, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी प्राची कांबळे यांनी केले.
अशा प्रकारे कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

  • प्रणाली पोळ.
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत