परमबीर सिंग यांच्याविरूद्ध अकोल्या सिटीतील कोतवली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्याविरूद्ध अकोल्या सिटीतील कोतवली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

अकोला : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध अकोल्या सिटीतील कोतवली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध अॅट्राॅसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्याचा पोलिस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजार कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतवण्यात आले आहेत. असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोलाच्या पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

OIP 2 2

विशेष म्हणजे ह्या पोलिस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

त्याचसोबत परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी म्हंटले आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस अधिकाऱ्यांचा देखील ह्यात समावेश होता, असा दावा भिमराज घाडगे यांनी केला. तसेच परमबीर सिंग यांच्यावर अजून काही आरोप दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अॅट्राॅसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह एकूण २७ पोलिस अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून हे सर्व प्रकरण ठाणे पोलिस वर्गाकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता या पुढील तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत