परतुर तशिल कार्यालय अंतर्गत रेशन स्वस्त धान्य वाटपाचा महाघोटाळा

परतुर तशिल कार्यालय अंतर्गत रेशन स्वस्त धान्य वाटपाचा महाघोटाळा

परतुर : परतुर तशिल कार्यालय अंतर्गत रेशन स्वस्त धान्य वाटपाचा महाघोटाळा,प्रकाश बापु सोळंके,मनसे जिल्हाध्यक्ष जालना,यांनी मा.विभागीय आयुक्त साहेब यांना दिलेल्या निवेदनात श्री सोळंके पुढे म्हणाले,आपले लक्ष वेधू इच्छितो की जालना जिल्ह्यासह, जालना जिल्ह्यातील परतुर तहसील अंतर्गत रेशन दुकानदारांना धान्यचा पुरवठा करण्यात येतो, तो पुरवठा करतानी तहसील पुरवठा अधिकारी व संबंधित पुरवठा यंत्रणा मोठा घोटाळा करून अवैधरित्या पैसा कमाई करीत आहेत, संबंधित धान्य माल सप्लाय पुरवठा करणाऱ्या गुत्तेदारा कडुन, प्रत्येक महिन्याला परतुर तहसीलच्या गोडाउन मध्ये धान्य येते, गोडाउन मध्ये धान्य उतरल्यानंतर प्रत्येक दुकानदाराला त्याचे वाटप होते असते, धान्य वाटप करतांनी प्रत्येक बॅगमधून (पोत्यातून) 2 किलो धान्य काढून घेतल्या जाते, धान्य काढून घेतल्यानंतर या धान्याच्या बॅग नवीन पोते निर्माण करून धान्याच्या बॅग तयार करून परत रेशन दुकानदारांना वाटत होते, यांनी 22 किलो धान्य काढून घेतल्यानंतर पुरवठा अधिकाऱ्याकडे मुबलक धान्याचा साठा निर्माण होतो, हे दोन दोन किलो काढून घेतलेले

2e5cfc61 7971 4859 8703 51572555cbee

धान्य याचे व्यवस्थित नियोजन केले जाते, आणि पुढच्या महिन्यात येणारे धान्य सप्लाय करणारा ठेकेदार इथून पुढे या घोटाळ्यात सामील होतो, हा नियोजनबद्ध घोटाळा केल्यामुळे आणि सगळा हिशोब करून प्रत्येक बॅग मधून काढलेले धान्य त्याची नोंद,पुढच्या महिन्यात येणार धान्य याची नोंद, याचे अचूक गणित हिशोब करून झाल्यानंतर पुढच्या तो धान्य घेऊन येणारा ट्रक परस्पर काळ्या बाजारामध्ये त्या धान्याची विक्री होते, या घोटाळ्यात जिल्हा पुरवठा अधिकारयया पासून परतुर तहशील धान्य पुरवठा अधिकारी संबंधित गोडाऊन लिपिक पर्यंत ही यंत्रणा सामील होऊन घोटाळा करीत आलेली आहे, हा घोटाळा थांबवायचा असेल तर विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद यांनी पथक नेमून गोडाऊनची निडर अधिकाऱ्यामार्फत तपासणी करूण सखोल चौकशी या धान्य घोटाळ्यातील घोटाळा बाहेरील व यामध्ये जिल्ह्या पासून तालुक्या पर्यंत अनेक धान्य पुरवठा अधिकारी-कर्मचारी निलंबित होतील, कारण हा भ्रष्टाचार येथेच थांबत नाही, संबंधित रेशन दुकानदाराला 2/2 किलो रेशन कमी दिल्यामुळे दुकानदार सुद्धा नागरिकांसोबत तसेच वागतो, दुकानदार काही नागरिकांना कमी अधिक जास्त धान्य देऊन तडजोड करतो व कमी धान्य देऊन नागरिकांची फसवणूक होते, पण याची सुरूवात मुळापासून म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांरी कार्यालयापासून सुरुवात होते, खरे भ्रष्टाचाराचे मुळ परतूर तहसील अंतर्गत पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध नियोजित घोटाळा गोडाऊन मध्ये होतो, म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयापासून परतूर तहसील अंतर्गत धान्य पुरवठा अधिकारी व संबंधित यंत्रणा यांच्या धान्य घोटाळ्याची पथक नेमून चौकशी करण्यात यावी, अशी जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने मागणी करण्यात येते, पथक नेमून करूण लवकरच निलंबनाची कारवाई होईल ही अपेक्षा आहे, श्री.सोळंके म्हणाले

9ba081ca 36b5 41d3 afc4 d551c21a0d2f

“जड खराब नही पेड हि खराब है”म्हणून जालना जिल्ह्यासह, जालना जिल्ह्यातील परतुर, पुरवठा अधिकाऱ्या पासून, तहसील अंतर्गत पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित नियोजनबद्ध, सगळे पुरावे नष्ट करून घोटाळा करण्यात येतो, याचे लोन स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचते म्हणून स्वस्त धान्य या घोटाळ्याची परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतो, म्हणून विभागीय आयुक्त औरंगाबाद आपल्या कार्यालयामार्फत निडर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या परतुर गोडाऊन मधून स्वस्त धान्याच्या घोटाळ्याची चौकशी करुण संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, योग्य ती परतुर तहसील येथील पुरवठा अधिकारी यांची सखोल चौकशी व गोडाऊनची तपासणी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 1 जून 2021 नंतर मनसे स्टाईल आंदोलन किंवा उपविभागीय अधिकारी परतुर कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी शेवटी असा इशारा ही मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश बापु सोळंके यांनी दिला…

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत