पबजी खेळणाऱ्यांसाठी खुशखबर: पबजी मोबाईल गेम आता एका नव्या नावासह होणारा भारतात लाँच

पबजी खेळणाऱ्यांसाठी खुशखबर: पबजी मोबाईल गेम आता एका नव्या नावासह होणारा भारतात लाँच

भारत : आता मोबाईल गेम पबजी खेळणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. अनेक दिवसांनंतर आता PUBG मोबाईल गेम एका नव्या नावासह भारतात लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या गेमचं पोस्टर रिलीज केलं आहे. ज्यात हा गेम आता Battleground mobile india या नावाने रि-लाँच होणार असल्याचा खुलासा झाला आहे. कंपनीने याच्या लाँच डेटबाबत कोणताही खुलासा अजून केलेला नाही.

एका बातमीनुसार, battle royale गेम PUBG Mobile India नव्या नावाने Battleground Mobile India रि-लाँच होणार आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर, कंपनी नव्या नावाने भारतात पुन्हा येणार असल्याचा खुलासा झाला आहे. परंतु काही तासांनंतर कंपनीने आपल्या फेसबुक पेजवरुन रिलीज केलेलं पोस्टर आता हटवलं आहे.

अधिकृत पोस्टरमध्ये गेमबाबत Coming Soon लिहिलं असून कंपनीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही Battleground mobile India पोस्टर आहे. कंपनीच्या यूट्यूब पेज आणि फेसबुक पेजच्या प्रोफाईल पिक्चरच्या रुपात नवं पोस्टर Coming Soon सह देण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत PUBG सह अनेक चायनीज अॅप भारतात बॅन करण्यात आले होते. PUBG सोडून कोणत्याही इतर अॅपने भारतात पुन्हा एन्ट्री करण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. PUBG मोबाईल गेम डेव्हलपर कंपनी Crafton आणि केंद्र सरकारमध्ये गेम भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी अनेकदा बातचीत सुरू करण्यात आली. हा गेम भारतात पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीला भारत सरकारने घातलेल्या सर्व अटींकडे लक्ष द्यावं लागेल.

यापूर्वी कंपनीने, हा गेम खासकरुन भारतासाठी लाँच करणार असल्याचे सांगितले होते. PUBG मोबाईलच्या रि-लाँच ट्रेलरमध्ये युजरचा डेटा आणि प्रायव्हसीला सर्वात मोठं प्राधान्य असेल, असंही सांगण्यात आलं होतं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत