पत्रकार जुनेद बागवान आणि इतर मित्रांवर जीवघेणा हल्ला

पत्रकार जुनेद बागवान आणि इतर मित्रांवर जीवघेणा हल्ला

Journalist Junaid Bagwan and other friends fatally attacked

गेवराई प्रतिनिधी

अवैध धंद्याच्या बातम्या का छापतोस म्हणत याद राख, या पुढे आमच्या विरोधात बातम्या देशील तर, तुला जिवे मारू, अशी धमकी देत, पाच युवकांनी पत्रकार जुनेद बागवान यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्रावर लोखंडी राॅडने व कोयत्याने मारहाण करत जिव घेणा हल्ला केल्याची घटना सोमवार दि. 5 रोजी घडली असून, पत्रकार बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार बागवान बालंबाल बचावले असून, त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही युवकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.

दि. ५ जून रोजी ३. ३० च्या सुमारास गेवराई शहराजवळील मन्यारवाडी रोडवरील मुस्लीम कब्रस्तान येथे राम शिवाजी म्हेत्रे यांच्यासह काही जणांनी कब्रस्तानची विटंबना केली असल्याची माहिती मिळताच शहानिशा करण्यासाठी पत्रकार जुनेद बागवान यांच्यासह शहानवाज शब्बीर बागवान हे दोघेजण खाजगी वाहनाने त्या ठिकाणी गेले. यावेळी त्याठिकाणी कब्रस्तानामध्ये माउली आनंद बाप्ते, सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते, राम शिवाजी म्हेत्रे, बबलू रमेश सावंत, शुभम आनंद बाप्ते हे पाचजण कब्रस्तानामध्ये जुगार खेळत व दारु पित बसलेले होते. यानंतर बागवान हे पञकार आहे, याची जाणीव असल्याने, आरोपी करीत असलेल्या कृत्याचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द करीन, असे त्यांना वाटल्याने वरील तरुणांनी पत्रकार बागवान यांच्यासह त्यांच्या मित्रावर हल्ला चढवला.

यावेळी लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण केली. तसेच आरोपी सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते हा पिस्तुल मागे लागला होता. या हल्यामध्ये शहानवाज बागवान हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयातुन दाखल करुन पुढील उपचार कामी जिल्हा रुग्णालय बीड येथे पाठवले आहे. दरम्यान, पत्रकार बागवान हल्ल्यामधुन बचावले असून जर यापुढे बातमी छापली तर जिवे मारुन टाकू अशी धमकी आरोपींनी पत्रकार जुनेद बागवान दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले असुन पत्रकार संरक्षण कायदा सह विविध कलमा खाली गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून, या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत