पत्रकारांना वैद्यकीय खर्चात सवलत देण्याचे उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकारांना आश्वासन

पत्रकारांना वैद्यकीय खर्चात सवलत देण्याचे उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकारांना आश्वासन

Uran Medical Welfare Association assures journalists of medical expenses concession to journalists

  • विठ्ठल ममताबादे पत्रकार हा लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचा चौथा आधारस्तंभ आहे.जणसामान्यांच्या प्रश्नांना, समस्यांना न्याय देणाऱ्या घटकापैकी पत्रकार हा एक महत्त्वाचा घटक आहे.कोरोना काळात पत्रकारांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.त्यामुळे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या उरण मधील डॉक्टरांच्या संघटनेने उरण मधील सर्व पत्रकारांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. व त्या दृष्टिकोनातून आज उरण मधील सर्व पत्रकारांचा ‘गौरव पत्रकारितेचा 2021’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याचे उरण मेडिकल वेलफेयर असोसिएशन उरणचे सचिव डॉ सत्या ठाकरे यांनी सांगितले.

उरण मधील सर्व पत्रकारांचा गौरव सन्मान करण्याच्या हेतूने उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन तर्फे भोईर लॉन्स कोटनाका, उरण शहर येथे दिनांक 9/ 7/2021 रोजी रात्री नऊ वाजता पत्रकारांचा सत्कार, गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना शाल गुलाब पुष्प,सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पत्रकारांचा सन्मान करण्याच्या पाठीमागचा उद्देश संघटनेचे अध्यक्ष डॉ विकास मोरे यांनी आपल्या मनोगतातून(प्रास्तविकातून )व्यक्त केला.यावेळी पत्रकारांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी मंत्रालयाचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो,प्रदीप पाटील, संजय गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी आपले मनोगतात पत्रकारांना कोरोना काळात अनेक गोष्टीचा सामना करावा लागला. पत्रकारांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. पत्रकारांचे आरोग्यस्थिती बिघडली गेली. कोरोनामुळे अनेक पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पत्रकारांना वाईट काळात कोणाचेच आधार मिळत नाही.अडी अडचणीच्या वेळी पत्रकारांना कोणी मदत करत नाही. त्यामुळे पत्रकारांची सध्याचे सत्यस्थिती सर्वांसमोर मांडत पत्रकारांना हॉस्पिटल खर्च, वैद्यकीय खर्चात 50 टक्के सवलत देण्यात यावी,उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन तर्फे उरणच्या पत्रकारांना माफक दरात सेवा सवलती द्याव्यात अशी मागणी केली.जेणेकरून त्याचा फायदा समाजातील ग्रामीण पत्रकार, समाजातील गोरगरीब पत्रकारांना होईल.

WhatsApp Image 2021 07 10 at 7.50.20 PM

पत्रकार विठ्ठल ममताबादे म्हणाले की हा पत्रकारांचा गौरवाचा कार्यक्रम सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान तात्पुरता आहे. जर पत्रकारांचा कायमचा सन्मान करायचा असेल तर पत्रकारांना कायमस्वरूपी हॉस्पिटलच्या, वैद्यकीय खर्चात विविध सवलती द्यावे अशी विनंती यावेळी केली. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या मागणीचा, विनंतीचा मान राखून आपली मागणी रास्त आहे लवकरच उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन उरण या डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून विविध सेवा सवलती , बिलात सूट देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन डॉ सत्या ठाकरे यांनी पत्रकारांना दिले.उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन उरण या संघटनेच्या मिटिंग मध्ये पत्रकारांना सवलत देण्याचा प्रस्ताव मांडून सदस्यांची मते लक्षात घेऊन, जाणून घेऊन लवकरच आपला निर्णय पत्रकारांना कळविला जाईल असे डॉ सत्या ठाकरे यांनी सांगितले.

व्यासपीठावर उपस्थित असलेले उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे सचिव -डॉ सत्या ठाकरे,अध्यक्ष डॉ विकास मोरे,इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयचे अधीक्षक डॉ मनोज भद्रे , डॉ मंगेश डाके, डॉ घनश्याम पाटील आदींनी पत्रकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ सत्या ठाकरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित सर यांनी केले.

उरण मधील जेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. समाजात त्यांचे महत्वाचे स्थान होते. पत्रकारितेतुन अतुल पाटील यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्याचे आठवण म्हणून त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच स्वर्गीय अतुल पाटील यांचे पुत्र व कन्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.उरण मधील ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो,मधुकर ठाकूर,प्रदीप पाटील, संजय गायकवाड,दत्ता म्हात्रे,दिलीप कडू, जीवन केणी,सूर्यकांत म्हात्रे,अजित पाटील,सुभाष कडू,राजकुमार भगत, अनंत नारंगीकर ,दिनेश पवार,महेश भोईर, पंकज ठाकूर, दीप्ती पाटील, विठ्ठल ममताबादे,सुयोग गायकवाड आदी पत्रकारांना यावेळी गुलाब पुष्प,शाल सन्मानचिन्ह देऊन ‘गौरव पत्रकारितेचा 2021’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत