पतीसमोर झाला पत्नीचा बलात्कार ; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पतीसमोर झाला पत्नीचा बलात्कार ; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Wife raped in front of husband; Video of incident goes viral

बिहार – सर्वांना हादरून टाकणारी एक माहिती समोर आली आहे. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली. गेल्या आठवड्यापूर्वी बिहारच्या छपरा जिल्ह्यात काही नराधमांनी एका महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर या नराधमांनी आपल्या मोबाइलवरून या भयंकर घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल देखील केला.

सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल होत असताना हा व्हिडिओ सारण पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांच्यापर्यंतही पोहोचला. या व्हिडिओची त्वरित दखल घेत पोलीस अधीक्षकांनी आमनौर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना याची तपासणी करून व्हिडिओमध्ये दिसणार्‍या आरोपींची ओळख पटविण्यासाठी व त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले.

गोसी अम्नौर ते परशुरामपूरकडे जाणाऱ्या आरईओ मार्गादरम्यानच्या मोठ्या कालव्याच्या ठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला असून व्हिडिओवरून असे दिसते की, ती महिला आपल्या पतीसह कुठेतरी जात होती. यावेळी या दोघांना कालव्याजवळ नराधमांनी पकडले व घाबरवून तिला जवळच्या झाडींमध्ये नेले आणि या महिलेच्या नवऱ्यासमोर अपमानास्पद कृत्य केले. तसेच, त्या महिलेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.

पोलिस अधीक्षक संतोष कुमार म्हणाले की, “पीडित महिलेचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर या सर्व अटक आरोपींविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत, त्या आधारावर या सर्व आरोपींना कायदेशीररीत्या वेगाने शिक्षा देण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू केली जाईल”.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत