पंतप्रधान मोदी आज चक्रीवादळ ‘यास’ संदर्भात बैठक घेणार; NDMA च्या अधिकाऱ्यांशी करणार चर्चा

पंतप्रधान मोदी आज चक्रीवादळ ‘यास’ संदर्भात बैठक घेणार; NDMA च्या अधिकाऱ्यांशी करणार चर्चा

दरम्यान, नौदलाने वादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी आठ पूर मदत आणि बचाव दल व्यतिरिक्त, गोताखोरांच्या चार पथकांना ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे पाठविले आहे. ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोस्ट गार्ड सज्ज आहेत.

Cyclone Yaas: चक्रीवादळ तौक्तेनंतर, 26 मे रोजी चक्रीवादळ वादळ ‘यास’ (Cyclone Yaas) चा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालचा किनाऱ्यावर धडक्याची शक्यता आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) च्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीविषयी चर्चा करणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, चक्रिवादळ यास वायव्य, उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे, जे 24 मे पर्यंत चक्रीवादळ वादळाच्या रूपात बदलेल आणि येत्या 24 तासात अत्यंत गंभीर चक्रीवादळाचे रुप धारण करेल. यास चक्रीवादळ 26 मे च्या सकाळपर्यंत, पश्चिम बंगालजवळील उत्तर बंगालचा उपसागर आणि त्यास लागून ओडिशा आणि बांगलादेशच्या सीमेवर पोहोचेल.

पश्चिम बंगाल सरकारने ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: नियंत्रण कक्षात हजर राहतील. ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, संवेदनशील भागासाठी मदत साहित्य पाठविण्यात आले असून, किनारपट्टी व नदी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. 

नौदलाने चार युद्धनौका तैनात

आपल्या चार युद्धनौकांव्यतिरिक्त, भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वादळ ‘यास’ च्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी अनेक विमानेही तैनात केली आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आदळलेल्या तौक्ते नावाच्या तीव्र चक्रीवादळानंतर भारतीय नौदलाने मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य राबवले. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथे प्रचंड विनाश केला.

दरम्यान, नौदलाने वादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी आठ पूर मदत आणि बचाव दल व्यतिरिक्त, गोताखोरांच्या चार पथकांना ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे पाठविले आहे. ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोस्ट गार्ड सज्ज आहेत. देशाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर तयार होणार्‍या ‘यास’ चक्रीवादळामुळे उद्भवू शकणार्‍या संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी भारतीय तटरक्षक दल करीत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत