पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे-जूनमध्ये केंद्र सरकार ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणार- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे-जूनमध्ये केंद्र सरकार ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणार- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

परभणी : देशभरात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि राज्य सरकारांवर कठोर निर्बंध लादले जात आहेत. देशातील विविध भागातील गरीब आणि दैनंदिन मजुरी बंद पडल्यामुळे अनेक राज्यांमध्ये सर्वसामान्य लोकांवर अडचणींचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत त्यांचे पोट भरण्यासाठी केंद्र सरकारने गरिबांना मोफत धान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जून २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्यास मान्यता दिली असून त्याअंतर्गत मे आणि जून महिन्यात गोर गरीब लोकांना ०५ किलो मोफत धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे गरिबांना दिलासा मिळेल, असा विश्वास माजी मंत्र आमदार बबनराव लोणीकर व्यक्त केला आहे.

सरकारच्या या निर्णयाचा देशातील सुमारे ८० कोटी लोकांना फायदा होणार आहे. लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने मागील वर्षीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेप्रमाणेच ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत सुमारे ८० कोटी लोकांना २ महिन्यांसाठी दरमहा ५ किलो मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. भारत सरकार या उपक्रमासाठी २६००० कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. जेव्हा कोरोना विषाणूची दुसरी लाट देशाला भेडसावत आहे, तेव्हा देशातील गरीबांना पौष्टिक आधार मिळाला पाहिजे. या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय गघेतला असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान ही योजना सुरू केली होती. लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार थांबले होते आणि स्थलांतरित कामगार आपल्या घरी परतत होते. त्यांना घरी आल्यानंतर लगेचच अन्नाचा त्रास होऊ नये या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. असेही लोणीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

आता पुन्हा एकदा देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. अनेक राज्यात आंशिक संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले गेले आहेत. हे लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत दोन महिन्यांचे मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

लोणीकर यांनी मानले मोदींजींच्या आभार
सर्वसामान्य लोकांची काळजी करणारे सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडे बघितले जाते. मोदीजी कायम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानतात म्हणून सर्व भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवतात अशा शब्दात मोदींजींच्या कामाचे कौतुक करत गोर गरीब लोकांना अन्न धान्य रुपी मदत केल्याबद्दल लोणीकर यांनी मोदींजींचे आभार मानले आहेत

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत