पंढरपुरात कामदा एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात नयनरम्य अशी आरास; एकदा क्लिक करून बघाच

पंढरपुरात कामदा एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात नयनरम्य अशी आरास; एकदा क्लिक करून बघाच

पंढरपूर : आज कामदा एकादशी असल्यामुळे ही एकादशी अत्यंत खास असल्याचे मानले जाते. त्यानिमीत्त आज पंढरपुरात श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचं दर्शन द्राक्षांच्या वेलींच्या सजावटीसोबत पहायला मिळतं आहे. चैत्री वारी कामदा एकादशी निमित्त कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना दर्शन घेणे शक्य नसले तरी सोशल माध्यमांद्वारे आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकता. 

विविध सण, उत्सव यानिमित्ताने श्री विठ्ठल – रुक्‍मिणी मंदिरात दरवेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न म्हणजेच रंगीबेरंगी फुले आणि तसेच त्या काळामध्ये उपलब्ध असलेली फळे यांचा वापर करून मनमोहक आरास केली जाते. त्यानुसार आज आकर्षक द्राक्ष वेली आणि द्राक्षांचे घड सजावटीसाठी वापरण्यात आले आहेत. आज कामदा एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षांची आरास तयार करण्यात आली आहे.

e6e96b79 eed4 4814 b0d0 a50d04b45fb4

चैत्रीवारी शुद्ध कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा आणि काकड आरती संपन्न झाली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावात श्री विठ्ठल रुक्मिणीची विशेष नित्यपूजा पुजारांच्या हस्ते करण्यात आली. तसेच कामदा एकादशी निमित्त मंदिरात द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट करण्यात आली. सजावटीसाठी ७०० किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला. संजय टिकोरे या भाविकाने चैत्री शुध्द एकादशी निमित्ताने सजावटीसाठी द्राक्ष दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत