निरोगी आरोग्यासाठी योग हीच गुरुकिल्ली- श्री करडे

निरोगी आरोग्यासाठी योग हीच गुरुकिल्ली- श्री करडे

yoga is successfull key for the healthy life

नवी मुंबई- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगा प्रशिक्षक श्री करडे आणि कशिश माने यांच्याद्वारे आज योगा दिन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबईतील सानपाडा येथील श्री शंभू डान्स योगा फिटनेस इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी श्री करडे आणि कशिश माने यांनी योगाचे विविध प्रात्यक्षिके दर्शवून योगा करण्याविषयी जनजागृती केली.

या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६. ३० वाजता झाली असून सकाळी ९. ३० वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. दोन गटांमध्ये विभागलेल्या या योगा सत्रामध्ये प्रथम गटात ४५ हुन अधिक महिला सहभागी झाल्या तर दुसऱ्या गटामध्ये ३५ हुन अधिक पुरुषांचा समावेश होता. प्राणायम, शीर्षासन, भुजंगासन यांसारखे अनेक योग प्रकार या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आले . ‘मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योगा करणे अत्यंत आवश्यक आहे’, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

शरीर, मन, बुद्धी यांना एकत्र जोडणारे शास्त्र म्हणजे योग. भारताचं हे प्राचीन शास्त्र असून आता त्याचे ग्लोबल स्वरूप झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत निरोगी आरोग्य आणि मानसिक स्थिती चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग हीच गुरुकिल्ली.- श्री करडे, प्रशिक्षक.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत