नियमित आहारात हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

नियमित आहारात हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

मुंबई :  हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. साधारण एका दिवसामध्ये किमान दोन तरी हिरव्या भाज्या आहारात घेतल्या पाहिजेत. सध्याच्या धावपळीचा जीवनामध्ये आपण भाज्या खाणे टाळतो. मात्र, असे न करता दररोज हिरव्या भाज्या आपल्या आहारात घ्या.

पालक, मेथी, चवळी आणि शेपू इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. कोणत्याही रोगात, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपल्या हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी तसेच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात हिरव्या पालेभाजीच्या सुपने केली पाहिजे.

सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे, ढोकळा, डोसा यापैकी एखादा पदार्थ खा. रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा.

(टीप : आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत