नाशिकमधील झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर आता मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय;

नाशिकमधील झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर आता मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय;

मुंबई : नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व्हेंटिलेटरवरील रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा न झाल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

नाशिकमध्ये झालेल्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. दरम्यान या दुर्दैवी दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

nashik

मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका असा आदेश रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. १० मीटर दूरपर्यंत जाळ्या लावा. तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा, एकदा जाऊन सर्व सुरळीत आहे की नाही याची काळजी घ्या असेही सांगितले असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

तसेच लिक्विड ऑक्सिजनसाठी असणारी यंत्रणा आणखी सुसज्ज करतोय असे सांगताना किशोरी पेडणेकर यांनी कोविड सेंटर उभे करतानाच आपण सुरक्षेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली होती अशी माहिती दिली आहे. “आपण सगळ्यांचेच ऑडिट करत आहोत. खासगी रुग्णालयात असणाऱ्या बेड्सच तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे आणि रुग्णालयाचे ऑडिट होत आहे. ऑडिट आणि सुरक्षा एकत्र सुरु आहे,” असेही त्या म्हणाल्या.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत