“नारायण गुरू कॉलेज येथे विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन”

“नारायण गुरू कॉलेज येथे विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन”

"Students' sit-in agitation at Narayan Guru College"

WhatsApp Image 2021 06 29 at 9.07.23 AM

गेल्या दीड दोन वर्षापासून सगळे विश्व कोरोना महामारीने त्रस्त झाले आहेत. शिक्षण क्षेत्र देखील या पासून सुटले नाही त्यामध्ये विद्यार्थ्यांना या कोरोना च्या काळात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच महाविद्यालय,विद्यापीठ आणि सरकार विद्यार्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे तर काहींचे पालक कोरोना मुळे मृत पावले आहेत अशा नाजूक परिस्थिती मध्ये महाविद्यालयाकडून विद्यार्थांच्या समस्या अभाविप पर्यंत पोहचाव्या आणि त्या सोडविण्यासाठी अभाविप पूर्व मुंबई च्या वतीने श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या विद्यार्थांसाठी “छात्र संवाद(Virtual Talk With Students)” चे आयोजन करण्यात आले आहे. या छात्र संवादात विद्यार्थ्यांनी आपले विविध प्रश्न उपस्थित केले.

WhatsApp Image 2021 06 29 at 9.07.28 AM


या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अभाविप पूर्व मुंबई च्या वतीने महाविद्यालयास वारंवार निवेदन देवून देखील महाविद्यालयाने या वर उपाय योजना केल्या नाही पण विद्यार्थ्यांना लेक्चर मध्ये न घेणे या प्रकारच्या समस्या निर्माण केल्या.
या सगळ्या समस्या लक्षात घेता अभाविप पूर्व मुंबईने चेंबूर येथील श्री नारायण गुरू महाविद्यालय येथे जावून प्राचार्यांच्या केबिन मध्ये आणि केबिन च्या बाहेर बसून तब्बल ४ तास ठिय्या आंदोलन केले आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला.
सदर आंदोलन केल्यानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ४ हप्त्या (INSTALLMENT) ची सोय करून देण्यात आली तसेच महाविद्यालयाकडून देण्यात आलेली १००००रु. ही अट रद्द करण्यात आली. तसेच “२५००रु.” महाविद्यालय या वर्षी साठी कमी करेल असे आश्वासन महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे पण “२५००रु” कशाबद्दल आहेत शैक्षणिक शुल्काचे का अवैध आकारण्यात आलेले Infrastructure Development शुल्काचे ३००० रू याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही असे अभाविप पूर्व मुंबई संयोजक ओमकार जी मांढरे यांनी सांगितले. तसेच महाविद्यालय प्रशासनाकडून महाविद्यालय विकास निधी (infrastructure development) च्या नावाखाली घेण्यात येणाऱ्या “३०००रु” वर आणि फी कपात साठी देखील लवकरच पुढील बैठकीत निर्णय घेतील येतील असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले अशी माहिती पूर्व मुंबई मंत्री ऋषिकेशजी गर्जे यांनी दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत