नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन

नवी मुंबई- बुधवार दिनांक २३ जून २०२१ रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात बुधवार दिनांक २३ जून २०२१ रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही.

तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक २४ जून रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना देण्यात आली. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी देण्यात आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत