नवी मुंबईतील वाघ्या – मुरळी कलावंतांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

नवी मुंबईतील वाघ्या – मुरळी कलावंतांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

food distribution to vaghya- murali artists

नवी मुंबई- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ऐरोली नवी मुंबई येथे जय मल्हार वाघ्या- मुरळी व गोंधळ सेवा संस्थेच्या मदतीने पनवेल परिसरातील वाघ्या – मुरळी यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जागरण गोंधळ म्हंटले की खंजिरी व संभळाचा ठेका कानावर पडतो. येळकोट येळकोट जय मल्हार, अंबाबाईचा उदो उदो ही गर्जना ऐकावयास मिळते. गोंधळी अंबाबाईचा गोंधळ करतात तर वाघ्या मुरळी खंडोबाचे जागरण करतात.

WhatsApp Image 2021 06 29 at 10.22.00 AM 1

आताच्या कोरोना महामारीमुळे व संचार बंदीमुळे मोठ्या कार्यक्रमावर बंदी आल्याने वाघ्या मुरळी व गोंधळी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची जाणीव ठेऊनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितु खानविलकर, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या सहकार्याने या कलाकारांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक डी. डी. गायकवाड, पत्रकार वनिता बर्फे, समाजसेविका सतिशीला कांबळे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या नवी मुंबई महिला सचिव स्नेहा चांदोरकर, मानखुर्द विभागाचे अनिकेत भोईटे, ओमकार महाडिक, सनील कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जय मल्हार वाघ्या मुरळी व गोंधळ सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रेमकुमार बाविस्कर, सचिव निळकंठ पलंगे, खजिनदार विकास फलटणकर, मार्गदर्शक जनार्दन बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत