नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

  • विठ्ठल ममताबादे

उरण पनवेल रोड वरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी 5 महिन्यापूर्वी कोसळलेला पूल यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी गावातील ग्रामस्थांची खूप मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सिडको कार्यालय जवळील पूल कधीही कोसळू शकतो. जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या मार्गांवर वाहनांना बंदी घालण्यात आली असून वाहने दुसऱ्या मार्गाने वळविली जात आहेत.तर 5 महिन्यापूर्वी फुंडे येथील पूल कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता मात्र या ठिकाणी अजूनही नवीन पूल बांधला गेला नाही. त्यामुळे फुंडे पाणजे डोंगरी या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.शासकीय कार्यालयात जाणे-येणे तसेच बाजार व नोकरीनिमित्त येण्या-जाण्यासाठी सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घेऊन जावे लागत आहे.त्यामुळे वेळ पैसा श्रम वाया जात आहे. जास्त प्रमाणात खर्च होत आहे.याचा नाहक त्रास फुंडे डोंगरी पाणजे गावातील नागरिकांना होत आहेत.

त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ तसेच फुंडे ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य -ऍड कैलास म्हात्रे,डोंगरी ग्रामपंचायतचे उपसरपंच दर्शना घरत, फुंडेचे माजी सरपंच अशोक ठाकूर,नंदकुमार म्हात्रे, रमेश म्हात्रे, विलास म्हात्रे आदी मान्यवरांनी सिडको कार्यालय येथील आशिष कोब्रागडे सहाय्यक कार्यकारी अभियंता सिडको कार्यालय द्रोणागिरी नोड 1 या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. व पूल त्वरित बांधण्यात यावेत. पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.सदर अहवाल पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून याबाबत योग्य ते पाऊल उचलले जाईल असे सिडकोचे अभियंता आशिष कोब्रागडे यांनी माहिती दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत