नवीन पिढीकढून शिकायला आवडते – सचिन पिळगांवकर

नवीन पिढीकढून शिकायला आवडते – सचिन पिळगांवकर

विद्या प्रसारक मंडळाचे के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त )ठाणे, आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकतिसावे पुष्प दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, गायक, निर्माता सचिन पिळगावकर या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने ‘हाच माझा मार्ग’ या विषयावर ऑनलाईन स्वरूपात गुंफले.

WhatsApp Image 2021 09 25 at 7.57.34 PM

डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेची सुरुवात करताना प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी सचिनजीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ओळख करून देत केली. सचिन पिळगावकर यांच्या अगदी सुरुवातीच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाच्या आठवणींनी गप्पांना सुरुवात झाली. त्यांनी बालकलाकार म्हणून केलेल्या साठहुन अधिक चित्रपटांचा प्रवास ते बालिका वधू, नदीया के पार, अखियोंके झरोकोसे, गीत गाता चल अशा विविध चित्रपटातील त्यांच्या मुख्य भूमिकांबद्दलचे अनुभव सचिनजींनी सांगितले.

‘अशी ही बनवाबनवी’ या मराठीतील सुपरहिट चित्रपटाला 33 वर्षे झाली, या निमित्ताने सचिन पिळगावकर यांनी चित्रपटाच्या अनेक आठवणी ताज्या केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि इतर सर्व कलाकारांसोबतचा काम करण्याचा अनुभव व त्यातील गंमतीजमती त्यांनी सांगितल्या. चित्रपटातील बालगंधर्वांचा उल्लेख करण्यामागचा हेतू स्पष्ट केला.

त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल सांगताना गायनाची सुरुवात ते त्यांनी गायलेल्या गाण्यांविषयी अनुभव सांगितले. टीव्हीवरील सचिनजींनी केलेल्या विविध मालिकांच्या दिग्दर्शनाच्या अनुभवांबद्दल त्यांनी चर्चा केली.
ओटीटी प्लॅटफॉर्म वरचे वाढते पर्व आणि बदलांविषयी बोलताना त्यांनी change is permanent असे म्हणत त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत झालेल्या विविध बदलांविषयी सांगितले. सिनेमासृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिनजींनी आधी विविध तज्ञ मंडळींच्या हाताखाली काम करून विविध तंत्र, सिनेमा शैली, नवीन बदल, अभिनय करण्याच्या पद्धती शिकून घ्या आणि मग स्वतंत्रपणे कार्य करा असे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोतरे झाली. सचिनजींच्या प्रवास येऊ घातलेल्या सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्न सचिनजींना विचारले.
या व्याख्यानाचे आयोजन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य सुभाष शिंदे, डॉ. प्रियंवदा टोकेकर, प्रा. संगीता दीक्षित, ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे , सर्व प्राध्यापक गुगल मीट अँपद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सचिन पिळगांव कर यांची दिलखुलास मुलाखत प्रा. मानसी जंगम यांनी घेतली. कार्यक्रमाचे संयोजन उप प्राचार्य डॉ. महेश पाटील यांनी केले तर तांत्रिक बाजू महेश दूधभाते यांनी सांभाळली. व्याख्यानाची सांगता पसायदानाने झाली.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत