नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हे’ मॉकटेल्स, Watch Videos

नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हे’ मॉकटेल्स, Watch Videos

जे लोक कॉकटेल्स घेत नसतील त्यांच्यासाठी मॉकटेल्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच घरच्यांसोबत मॉकटेल्सची मजा देखील अगदी निर्धास्तपणे घेता येईल. पाहूयात काही मॉकटेल्स व्हिडिओज

नववर्षाची पूर्वसंध्या म्हणजेच 31 डिसेंबरची (31 December) रात्र सेलिब्रेट करणे हे सध्या एक फॅडच बनले आहे. या रात्री बहुतेक लोक घराबाहेर पडून हॉटेल, रेस्टॉरन्ट, पब, डिस्को मध्ये जंगी सेलिब्रेशन करतात. त्यात अनेक कॉकटेल्स आणि मॉकटेल्सचा आस्वाद घ्यायला अनेकांना आवडत असेल. मात्र यंदा कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर अनेकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. तसेच सरकारने देखीन अनेक निर्बंध घातली असल्याने आपण त्याचा आस्वाद घेऊ शकणार नाही. मात्र यामुळे जराही हताश न होता आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे मॉकटेल्स (Mocktails) बनवू शकता.

जे लोक कॉकटेल्स घेत नसतील त्यांच्यासाठी मॉकटेल्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच घरच्यांसोबत मॉकटेल्सची मजा देखील अगदी निर्धास्तपणे घेता येईल. पाहूयात काही मॉकटेल्स व्हिडिओज

फ्रूट पंच आणि स्ट्रॉबेरी क्रश मॉकटेल्स

सिंड्रेला मॉकटेल

पान, जांभळाचे मॉकटेल

या मॉकटेल्सनी तुम्ही थर्टी फर्स्टचे जंगी सेलिब्रेशन करु शकता. तसेच घरच्या घरी अगदी रेस्टॉरन्ट, पबप्रमाणे मॉकटेल्स बनवून नववर्षाची रंगत आणखी वाढवू शकता. यंदाचे वर्ष कोरोना व्हायरस, चक्रीवादळ आणि लॉकडाऊन यांसारख्या अनेक गोष्टींमुळे खूपच त्रासदायक गेले. अशात हे वर्ष लवकर संपू दे अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे तो दिवस अखेर आला असून आजच्या 31 डिसेंबर रात्रीची रौनक काही औरच आहे. हीच मजा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि या रात्रीचा गोडवा वाढविण्यासाठी या मॉकटेल्सपेक्षा उत्तम पर्याय असूच शकणार नाही. नाही का!!

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत