नवं वर्षे घेऊन आलंय फॅशनचा नवा ट्रेंड

नवं वर्षे घेऊन आलंय फॅशनचा नवा ट्रेंड

नव्या वर्षात नवा फॅशनचा ट्रेंड सुरु झाला आहे. २०२० हे वर्षे कोरोना विषाणुमुळे अनेक बंधनात गेले. लॉकडाऊनमध्ये शॉपिंग बाजारपेठाही बंद होत्या त्यामुळे शॉपिंग फ्रेंडलींसाठी हे नवे वर्ष नवी फॅशन ट्रेंड घेऊन सज्ज झाले आहे. मुंबईतील अनेक फॅशन स्ट्रीटस नवनवीन पॅटन, डिझायन्स फॅशनेबल, फंकी कपड्यांनी सजल्या आहेत. चला तर पाहु मग नव्या वर्षात काय आहे फॅशनचा नवा ट्रेंड…

१. फॅशनेबल मास्क

कोरोना आल्यापासून साऱ्यांनाच मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच मास्क लावूनच घराबाहेर पडतात. या मास्कच्या वाढत्या मागणीमुळे बाजारपेठांमध्ये आता लहानपासून ते मोठ्य़ापर्यंत साऱ्यांनाच आवडतील असे मास्क दिसत आहेत. महिनांना साडी, ड्रेस, पॅन्ट, टी-शर्टवर मॅच होतील असे तर पुरुषांच्या शर्टला मॅचिंग मास्क बाजारात उपलब्ध होत आहेत. या मास्कनं संरक्षणही होईल आणि तुम्हाला स्टायलिश दिसण्यात मदतही होईल.

२. क्रॉप टॉप्स

तरुणींमध्ये सध्या क्रॉप टॉप्सची चलती आहे. अनेक तरुणी फॅशनचा हा नवा ट्रेंड फॉलो करत आहेत. त्यामुळे फॅशन मार्केटमध्ये टीशर्ट टाईप क्रॉप टॉप्सपासून ते कुर्ता पॅटन असा अनेक डिझायनचे क्रॉप टॉप्स दिसत आहेत. हे क्रॉप टॉप्स परिधान करुन आपण सहज वावरु शकतो. क्रॉप टॉप्सबद्दल चांगली गोष्ट म्हणजे क्रॉप टॉप्स स्कर्ट, जिन्स आणि शॉर्टवरसुद्धा उत्तम दिसतात.

३. फ्लोरल ड्रेसेस

फ्लोरल ड्रेसेस हे कुठेही आणि कधीही वापरता येतात. तुम्ही पार्टीसाठी बाहेर जाणार असाल किंवा मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाणार असाल वेअर करु शकता. फ्लोरल ड्रेसेस कधीही ऑफ ट्रेंड जात नाहीत. एवढंच नाही तर तु्म्ही ऑफीसला सुद्धा हे ड्रेसेस परिधान करू शकता. तसेच पार्टी, बर्थडे, नॉर्मली पण आपण वजनाला हलके फुलके फ्लोरल ड्रेस वेअर करु शकतो.

४. बॉयफ्रेंड जॅकेट

बॉयफ्रेंड जॅकेट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही टिशर्टवर अगदी कुर्त्यावरही हे जॅकेट वेअर करु शकता. त्यात आता हिवाळा असल्यानं हे जॅकेट तुमचं थंडीपासून संरक्षण करेल. शिवाय तुम्ही ट्रेंडसोबत सुंदरही दिसता. हे जॅकेट लूज असल्यानं कोणीही कंफर्टेबली वापरु शकतात.

५. डेनिम ड्रेस

डेनिम ड्रेसेस दिसायला अगदी रॉयल आणि आकर्षक असतात. डेनिम ड्रेसेसची साईज ही फ्री असल्याने ते स्लिम दिसण्यात मदत करते. डेमिन ड्रेस तुम्हाला स्लिम आणि ट्रेंडी लूक देतील. मुख्यत: नाईट पार्टीमध्ये डेनिम ड्रेसेस वेअर केल्यास सुंदर दिसतात. यात डेनिमला वेगवेगळे वॉश असतात त्यामुळे डेनिम फंकी लूकसुद्धा देतं.

६. शॉर्ट पॅन्ट्स

सध्या साऱ्यांनाच लॉकडाऊननंतर नव वर्षानिमित्त फिरायला जाण्याचे वेध लागलेत. त्यामुळे तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर शॉर्ट पॅन्ट्स परिधान करण उत्तम ठरू शकतं. शॉर्ट पॅन्ट्स ट्रेंडीसुद्धा दिसतात सोबतच कॅरीसुद्धा व्यवस्थित करता येतात. तसेच बीच, किंवा हाऊस पार्टीमध्ये शॉर्ट पॅन्टवर लूक टी शर्ट असे कॉम्बीनेशन अगदी साजेस दिसते.

७. प्लाझो

सध्या अनेक तरुण जीन्सला उत्तम पर्याय म्हणून प्लाझो खरेदी करतात. वापरायला सुटसुटीत आणि दिसायला सुंदर असे प्लाझो सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. कुठे कार्यक्रमासाठी किंवा लग्नाला जायचं असेल तर क्रॉप टॉप आणि प्लाझोमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता. सध्या क्रॉप टॉप प्लाझोचा चांगलाच ट्रेंड सुरू आहे. तुम्हाला क्रॉप टॉप प्लाझोमध्ये ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशी निवड करता येईल. त्याचप्रमाणे सिंपल शर्टखालीही जीन्सप्रमाणेच दिसणाऱ्या प्लाझो वेअर करत एक ऑफिस लूक मिळवू शकता.

८. प्लेन साडी, इरकली साडी आणि ऑक्सिडाईझ ज्वेलरी

सध्या लग्न समारंभात प्लेन साडी आणि ऑक्सिडाईझ ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे. हा लूक खूप तुम्हाला क्लासी दिसण्यात नक्की मदत करू शकतो. तसेच इरकली साडीवर ऑक्सिडाईझ ज्वेलरी हा लूक देखील अधिक तरुणी पसंत करत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत