नदीवरच्या बंधाऱ्यात माती साचल्याने तीन एकर शेतात पाणीच पाणी

नदीवरच्या बंधाऱ्यात माती साचल्याने तीन एकर शेतात पाणीच पाणी

Water in three acres of fields due to accumulation of soil in the dam on the river

तीन एकर शेतीतले पीक गेले वाहून माती वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथील शेतकरी राहुल काळे यांच्या गट नंबर तीनशे दहा मध्ये तीन एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे राहुल काळे यांच्या शेतात शेजारी गावलगत नदी आहे या नदीवर तीन ते चार दगडी सिमेंट बंधारे आहेत नदीत चिखलगाळ साचल्याने पाणी नदीच्या वरून वाहत आहे राहुल काळे यांच्या शेतात नदीचे पाणी घुसल्याने तीन एकर शेतात माती वाहून गेली आहे पिके वाहून गेले आहेत त्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी राहुल काळे यांच्या मदतीसाठी प्रशासनाने पुढे येऊन मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी बांधवांनी केली आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथील शेतकरी राहुल काळे यांच्या गट नंबर तीनशे दहा मध्ये गावालगत ची नदी असल्याने या नदीवर तीन ते चार दगडी सिमेंट बंधारे आहेत झालेल्या पावसात सर्व पाणी त्या नदीला आल्याने नदीत चिखल गाळ साचल्यामुळे वरफलो होऊन नदीचे पाणी राहुल काळे यांच्या शेतात घुसले आणि सर्व कापूस तूर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे माती वाहून जात आहे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे बी बियाणे केलेली मेहनत वाया गेली आहे आपत्ती व्यवस्थापन पिक विमा कंपनी आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून राहुल काळे व इतर या परिसरातील गावालगतच्या नदीवरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी बांधवांनी केली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत