धनत्रयोदशी महत्त्व काय ?

8FD047E8 F1A5 4B36 AD8C 99D3830B74AF

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला  जाणारा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवसापासून दिवाळीची सुरवात होते.
असं म्हंटलं जातं की या  दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे डोळे दिपून जाऊन तो माघारी फिरतो आणि राजाच्या मुलांला जीवदान मिळते. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे म्हटले जाते. अशी दंतकथा  सांगितली पुराणात सांगितली आहे.तसेच या दिवशी प्रत्येक जण एकेमकाना धनत्रयोदशी च्या शुभेच्छा देऊन दिवसाचे महत्व वाढवतात आणि  घरासमोर रांगोळी काढण्याबरोबरच विद्युत रोषणाई देखील केली जाते.
याचबरोबर धन, संपत्ती आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. यामध्ये उपजिविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे म्हणजेच आपले काम व त्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंचे पूजन केले जाते. ज्याद्वारे आपण धनप्राप्ती करतो त्याचेही पूजन केले जाते.
व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने, त्यामधील साहित्य या सर्वांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही देखील तयार  केली जाते.

लक्ष्मी दुरेकर
एस. जी. बर्वे म.न. पा शाळा
सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मीडिया अकादमी, इयत्ता – नववी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत