धक्कादायक ! महिलांच्या खोलीतील बल्बमध्ये लपवला छुपा कॅमेरा

धक्कादायक ! महिलांच्या खोलीतील बल्बमध्ये लपवला छुपा कॅमेरा

Shocking! Hidden camera hidden in bulb in women's room

पुणे- मधील महिला डॉक्टरांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिला डॉक्टरच्या खोलीत छुपे कॅमेरे लावल्याप्रकाराणी एमडी डॉटरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हॉस्पिटल कॅम्पसमध्ये राहणाऱ्या दोन महिला डॉक्टर यांच्या रूममध्ये व बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा अर्थात छुपे कॅमेरा लावण्यात आला होता.हा प्रकार महिला डॉक्टरांच्या लक्षात येताच दोन्ही महिला डॉक्टरने भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. तसेच या हॉस्पिटलमध्ये काम करण्याऱ्या महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरु केला असता आणि या तपासाच्या अखेरीस असे समजले कि त्याच हॉस्पिटलमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून डॉ. सुजित जगताप म्हणून जे येत होते त्यांनीच हा सगळा प्रकार केला आहे. काल रात्रीच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये हा डॉ. शिकवण्यास येणार होता आणि त्याला हॉस्पिटलच्या प्रिमाईसेसमध्ये जाण्याची मुभा होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेत त्याने बनावटी चावीच्या साहाय्याने त्या महिलांच्या रूम मध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एक बल्बमध्ये स्पाय कॅमेरा लपवला होता आणि बेडरूममधील एका चार्जरमध्ये देखील हा स्पाय कॅमेरा लपविण्यात आला होता. पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत