धक्कादायक चक्क पैशासाठी वकिलाने गाठली माणुसकीची निच्चांकतेची पातळी

धक्कादायक चक्क पैशासाठी वकिलाने गाठली माणुसकीची निच्चांकतेची पातळी

3 करोड ची केली होती मागणी

डोळ्यावर पट्टी बांधत 3 वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेत मारहाण

टोलनाक्यावरील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

पोलिसांच्या सतर्कतेमुळे नशिकातून केली सुटका

अपहरण करणाऱ्यास अटक मात्र बाकीचे साथीदार फरार

प्रतिनिधी, नवी मुंबई

नवी मुंबईत आपल्याच क्लाइंट असलेल्या शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 करोडची खंडणी मागितली. मात्र पैसे दिले नाही म्हणून फिर्यादी ला नवी मुंबईतून अपहरण करण्यात आले. आरोपी विमल झा विरोधात खारघर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या विमल झा याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. विमल झा याने आपल्या क्लाइंट ला डोळ्यावर पट्टी बांधत 3 वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले त्या गाडीचे टोल नाक्यावरील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

WhatsApp Image 2021 04 13 at 10.57.36 AM

पहिल्यांदा कर्जत नंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिक ला एका फार्म हाऊसवर बंद खोलीत ठेवले होते. यावेळी वारंवार पैश्यांचा तगादा लावत डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. तसेच पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी डांबन्याचा प्लॅन होता. नाशिक च्या बिग बझार मध्ये खरेदी करत असताना फिर्यादीने नजर चुकवून बीग बझार च्या वर्कर च्या मोबाईल वरून पत्नीस कॉल करण्यात आला होता. ज्या नंबर वरून कॉल तो ट्रेस केला असता पोलिसांना नाशिक येथील लोकेशन सापडले. पोलिसांच्या चतुराई आणि सतर्कतेमुळे फिर्यादीची सुटका झाली.

WhatsApp Image 2021 04 13 at 10.57.36 AM 1

आरोपीचे साथीदार फरार पोलिसांचा तपास सुरू

आरोपी वकील विमल झा याच्यासह गुन्ह्यात असलेले चार साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. नवी मुंबईतून अपहरण करताना आरोपी सह 3 साथीदार होते आणि त्या नंतर नाशकात आणखी साथीदार सामील झाला. फिर्यादीला पैसे घेऊन ठार करण्याच्या बेतात हे सारे जण होते असे फिर्यादीने सांगितले.

WhatsApp Image 2021 04 13 at 10.57.35 AM 2

शिपिंग कंपनीचा मालक ह्या वकील विमल झा च्या संपर्कात गेल्या वर्षी आला होता. वकिलाने माझी सगळी कडे ओळख असून तुमच्या कंपनीचे सगळे काम मी करून देतो असे आश्वासन देत काम दिले नसतानाही परत परत भेटण्यास भाग पाडत असे, वकील विमल झा हा तेव्हा पासून मालकाच्या मागावर होता. जेव्हा शिपिंग कंपनी च्या मालकाने पुढील कोणताही व्यवहार नाही करण्याचे कळवले तेव्हा पासून ह्या वकिलाने त्याच्या स्वतःच्या अशिलाच्या मागे माणसे लावून तो कुठे आणि कसा जातो याची नोंद केली व त्याला धमकावू लागला की आता तुला मी अडकवणार आणि खोटी कंप्लेंट करून फसवणार . जेव्हा अशिलाने ह्या धमकी ला न जुमानता आपले सगळे संबंध तोडण्याचे प्रयत्न केले तेव्हा ह्या वकिलाने हे कृत्य करून मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत