द्वारकानगरी महिला बचत गटातर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

द्वारकानगरी महिला बचत गटातर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

Statement to The Chief Executives by Dwarkanagari Mahila Bachat Group

समस्या सोडविण्याची बचत गटातर्फे मागणी

-उरण (विठ्ठल ममताबादे )

उरण नगर परिषद हद्दीतील साई प्रेरणा कॉलनी, बोरी पाखाडी परिसरातील विविध समस्यांसंदर्भात द्वारकानगरी महिला बचत गट बोरी पाखाडी तर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनाद्वारे विविध समस्या त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. साई प्रेरणा कॉलनी बोरी येथील रहिवासी हे न चुकता उरण नगर परिषदेचा विविध कर(टॅक्स) न चुकता प्रामाणिकपणे भरत आहेत. मात्र नगर परिषदेकडून या परिसरात कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत अशी तक्रार सोसायटीचा रहिवाश्यांनी केली आहे.रस्ता नाही,बंदिस्त गटारे नाही. लहान मुले, वृद्ध, स्त्रिया यांना चिखलातून, कचऱ्यातून जावे लागते. बंदिस्त गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन विविध रोगराई पसरत आहे.

WhatsApp Image 2021 07 07 at 8.30.58 PM

रस्त्याच्या कडेला असलेले झाडांची फांदी वाढलेल्या आहेत. पाण्याचे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत.त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. ती त्वरित दुरुस्त करणे असे अनेक समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मुख्याधिकारी संतोष माळी यांनी त्वरित प्रतिसाद देत त्या त्या विभागातील अधिका-यांना बोलाविले व संबंधित काम त्वरित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी द्वारकानगरी महिला बचत गटाचे अध्यक्ष सीमा घरत,खजिनदार सुवर्णा पाटील, अमित म्हात्रे, रावभाई, हर्षदा सतेरे, राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत