‘दोन डोस घेतलेल्यांना निर्बंध शिथिल करणार’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

‘दोन डोस घेतलेल्यांना निर्बंध शिथिल करणार’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

'दोन डोस घेतलेल्यांना निर्बंध शिथिल करणार' - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात अजूनही कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल झाले नसून हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरणाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं”. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली. त्याचप्रमाणे “आमची अपेक्षा आहे की, महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. आम्ही रोज जशी लस येईल तसं अडीच-तीन लाख लसीकरण करत आहोत. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. जर ७० ते ८० टक्के लसीकरण झाले असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

“अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील,” असा मला आशावाद आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत