दोन डोस घेतलेल्याना ‘लोकलमध्ये इंट्री’

दोन डोस घेतलेल्याना ‘लोकलमध्ये इंट्री’

Entry into the locale after taking two doses

मुंबई: लोकल रेल्वेचे दरवाजे सामान्य प्रवाशांसाठी कधी खुले होणार, हा प्रश्न कळीचा बनत चालला असताना आज भाजपकडून पुन्हा एकदा याबाबतची मागणी सरकारपुढे मांडण्यात आली आहे. ज्यांनी कोविडवरील लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी यासाठी भाजपकडून आग्रह धरण्यात आला आहे.कोविड संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने सरकारकडून सावध पावले टाकण्यात येत आहेत. अनलॉक प्रक्रिया आहे त्याच स्थितीत थांबवण्यात आली आहे. असे असताना कोविड प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना निर्बंधांमधून सूट देण्याचा विचार पुढे येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याबाबत महत्त्वाचे विधान केले. ज्यांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना बाहेर फिरण्याची मुभा दिली पाहिजे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर पाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकलबाबतची मागणी पुढे रेटली आहे.

WhatsApp Image 2021 07 22 at 11.56.24 AM

करोना संकटामुळे सामान्य माणसाची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचे आज कंबरडेच मोडले आहे. लोकल बंद असल्याने त्याची प्रवासकोंडी झाली आहे. अशावेळी दोन लस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल रेल्वेत प्रवासाची मुभा द्यायला काहीच हरकत नाही. ही मागणी मी आधी केली होती आणि आज पुन्हा एकदा मी याबाबत इशारा देत आहे. जर दोन लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली गेली नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखील तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. सरकारने या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा द्यावा अशी माझी सरकारकडे आग्रही मागणी आहे, असेही दरेकर म्हणाले.प्रवीण दरेकर यांनी सामान्य माणसाची व्यथा मांडली आहे. ते म्हणाले, ‘करोनामुळे सर्वसामान्य माणूस चहुबाजूने बेजार झाला आहे. त्याला कामावर जाणं क्रमप्राप्त आहे. स्वत:चा बंद असलेला व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे. मात्र, लोकल प्रवासाची परवानगी नसल्यामुळे त्याला वाहतुकीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवासाचे इतर पर्याय आहेत पण तो खर्च त्याला परवडणारा नाही. कसारा, कर्जत आणि वसई-विरारपासून मुंबईत याचचं म्हटलं तरी सात-आठशे रुपये प्रवासावर खर्च होत आहेत. बसने प्रवास केल्यास दररोज त्यात तीन तीन तास वेळ खर्ची पडतो. अशा विचित्र कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. तरीही कामावर गेलं नाही तर घर चालणार नाही, या विवंचनेतून तो धडपडत मुंबई गाठत आहे, असे नमूद करत दरेकर यांनी लोकलबाबत आपलं म्हणणं मांडलं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत