देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर

देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर

Over 50,040 patients in the last 24 hours in the country

नवी दिल्ली : दोन दिवस रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत आल्यानंतर आज पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 50 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर पडली आहे तर 1258 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो 96.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात अजूनही 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत.त्या आधी एक दिवस म्हणजे शनिवारी देशात 48,698 रुग्णांची भर पडली होती तर 1183 लोकांचा मृत्यू झाला होता. काल एका दिवसात 64 लाख 25 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 32 कोटी 17 लाखाहून जास्त कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत