देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे.

देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे.

देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२५ पेक्षा जास्त कोरोना बाधित लोक आहेत. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी आपल्या घरापासून घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे. कोरोना व्हायरसपासून अधिक सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या घराचा कोरोना विषाणूपासून बचाव कसा करावा? याबाबत काही टिप्स्.

या जागा स्वच्छ ठेवा

डॉक्टरांनी सांगितले की, आपल्या दरवाज्याचे हॅंडल, टीव्ही आणि म्युझिक सिस्टम, रिमोट कंट्रोल, खुर्ची आणि बाथरूम नल सर्वात जास्त संक्रमित आहेत.तसेच लहान मुलांची खेळणी, किचन, करचाऱ्या डबा यातून जास्त प्रमाणात रोगाचा फैलाव होतो. मुख्य गेटचा दरवाज्याचे हॅंडलही साफ केले पाहिजे. कमीत कमी दोन वेळा स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पाहिजे. दरवाजा आणि टेबलही एकवेळा स्वच्छ केले पाहिजे.

घरात इन्फेक्शन होऊ नये म्हणून…

कोरोना व्हायरससारख्या संसर्गावर मात करणे सहज शक्य आहे. आपल्या घरात एक बादली पाण्यात तीन चम्मच ब्लिच टाका. ते तीन मिनिटांनंतर तसेच पाणी ठेवा. त्यानंतर स्वच्छ कपडा घेऊन सर्व ठिकाणी साफ करा. त्यानंतर सर्व ठिकाणी सुखा कपडा पुन्हा मारा.

administrator

  Related Articles

  1 Comment

  Avarage Rating:
  • 0 / 10
  • test , ऑक्टोबर 29, 2020 @ 11:47 am

   chan news

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत