देशात कोरोना रुग्णसंख्येत घट; दुसरी लाट मंदावली

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट; दुसरी लाट मंदावली

Decline in corona patient population in the country; Second wave slows down

देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, अद्याप धोका कमी झालेला नाही. दर दिवशी जवळपास 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. बुधावारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,792 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 624 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 41,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारीदेशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची चार लाखांहून अधिक आहे. सध्या 4 लाख 29 हजार 946 रुग्ण कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 9 लाख 46 हजार रुग्ण कोरोनाबाधित झाले होते.

मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,950 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 925 दिवसांवर गेला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत