देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी नोंद

देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी नोंद

The lowest incidence of corona virus in the country today is 125 days

देशात आज 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के आहे. देशात काल (सोमवारी) 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी आणि आतापर्यंतची लसीकरणाची आकडेवारी.

WhatsApp Image 2021 07 22 at 11.44.44 AM

आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर पोहोचला आहे. अशातच सोमवारी 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण 4 लाख 14 हजार 482 वर पोहोचली आहे. देशात 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 6 हाजर 130 वर पोहोचला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत