दुखापतीला कंटाळून KKRच्या क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती!

दुखापतीला कंटाळून KKRच्या क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती!

बर्‍याच दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गुर्नीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या वर्षी गुर्नीला ही दुखापत झाली होती, त्यामुळे तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळू शकला नाही. ३४ वर्षीय गुर्नीने दुखापतीतून पूर्णपणे बरे न झाल्याने निवृत्तीची घोषणा केली.

“माझ्या निवृत्तीची वेळ आली आहे. मी खांद्याच्या दुखापतीतून बरे होण्याचा प्रयत्न केला, पण मला वाईट वाटते की मला कारकीर्द संपवावी लागणार आहे. जेव्हा मी दहा वर्षांचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा चेंडू हातात घेतला होता. २४ वर्ष क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग होते आणि माझ्यासाठी हा एक चांगला प्रवास होता”, असे गुर्नीने निवृत्तीनंतर सांगितले.

गुर्नीने मे २०१४मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने इंग्लंडकडून १० एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले. आयपीएल २०१९च्या हंगामात तो कोलकाताकडून खेळला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली होती.

गुर्नीने बिग बॅशमध्ये नॉटिंगहॅमशायर आणि मेलबर्न रेनेगेड्स, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस ट्रायडेंट्स आणि पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लेडिएटर्समध्ये प्रतिनिधित्व केले होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत